Rohit Pawar on Kolhapur Bypolls Result 2022 : कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'लोकशाहीमध्ये ताकद आहे हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं आहे. आम्हा सर्वांना विश्वास आहे, आमची जागा निवडून येईल. त्यामुळे अहंकार आणि दडपशाहीच्या राजकारण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही हे जनतेने दाखवून दिलं आहे.' 'कदाचित आता निकाल लागल्यानंतर उद्या-परवापासून दडपशाहीचा अजून वापर केला जाईल. पण आधी महाराष्ट्र झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.


बाविसाव्या फेरी अखेरीस मविआच्या जयश्री जाधव आघाडीवर
बाविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3529 मते तर सत्यजीत कदम यांना 3226 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर आहेत. आता 23 हजार 705 मतांची मोजणी बाकी आहे. एकविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3452 मते तर सत्यजीत कदम यांना 3662 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. एकविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15222 मतांनी आघाडीवर आहेत. 26 पैकी 21 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून आता केवळ पाच फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक आहे.


'शरद पवारांवर भाजपची टीका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर'
दरम्यान, भाजपकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर होत असलेल्या टीकेबद्दल त्यांनी म्हटलं की, 'सुरुवातीपासूनच भाजपा पवार साहेबांच्या विरोधात सातत्याने टीका करत आहे. आज महाराष्ट्रात जिथे समता, एकता यांची वारकरी संप्रदायाने दिशा दाखवली आहे. अशा महाराष्ट्रामध्ये जातीयता, धार्मिकता निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यांचा एकच अजेंडा आहे मुंबईचा इलेक्शन. हे डोळ्यासमोर ठेवून सगळं चालू आहे. इलेक्शनचा अजेंडा सेट करत आहे. पण महाराष्ट्र वेगळा आहे. उत्तर प्रदेशसारखी रणनीती महाराष्ट्रात चालणार नाही. मग कुठलाही विषय आला की पवार साहेबांच्या विरोधात बोललं मीडिया कव्हरेज देते. भाजपा, मनसे आणि इतरही मोठे पक्षांची रणनीती पाहिली तर एकच मुद्दे आहेत.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha