Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 04:11 PM
चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाऊन येईन ; जयंत पाटलांचा टोला 

Jayant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन. माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत." असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला  आहे. 

Kolhapur North Bypoll Results 2022 : चोविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 18838 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : चोविसाव्या फेरीत जयश्री जाधव 5337 मते तर सत्यजीत कदम यांना 2830 मते मिळाली. चोविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 18838 मतांनी आघाडीवर आहेत. 


 


 

Kolhapur North Bypoll Results 2022 : तेविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 16,331 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : तेविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3337 मते तर सत्यजीत कदम यांना 2531 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 806 मतांची आघाडी मिळाली आहे. तेविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 16,331 मतांनी आघाडीवर आहेत. 


 


 


 

Kolhapur North Bypoll Results 2022 : बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : बाविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3529 मते तर सत्यजीत कदम यांना 3226 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर आहेत. आता 23 हजार 705 मतांची मोजणी बाकी आहे.


 

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3452 मते तर सत्यजीत कदम यांना 3662 मते

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3452 मते तर सत्यजीत कदम यांना 3662 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. एकविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15222 मतांनी आघाडीवर आहेत. 26 पैकी 21 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून आता केवळ पाच फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक आहे.


 

Kolhapur North Bypoll Results 2022 : विसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15432 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : विसाव्या फेरीत जयश्री जाधव 4366 मते तर सत्यजीत कदम यांना 3074 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 1292 मतांची आघाडी मिळाली आहे. विसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15432 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By-Election Results 2022 : एकोणिसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 14140 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By-Election Results 2022 : एकोणिसाव्या फेरीत जयश्री जाधव 3259 मते तर सत्यजीत कदम यांना 2974 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 285 मतांची आघाडी मिळाली आहे. एकोणिसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 14140 मतांनी आघाडीवर आहेत. एक मशीन बंद असल्याने V Pat मशीनमधून मोजणी सुरु केली आहे.


 


 


 

Kolhapur North By-Election Results 2022 : अठराव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 13855 मतांची आघाडी

Kolhapur North By-Election Results 2022 : अठराव्या फेरीत जयश्री जाधव 3948 मते तर सत्यजीत कदम यांना 3189 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 769 मतांची आघाडी मिळाली आहे. अठराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13855 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By-Election Results 2022 : सतराव्या फेरीत जयश्री जाधव 2795 मते तर सत्यजीत कदम यांना 3488 मते, या फेरीत सत्यजीत कदमांना 693 मतांची आघाडी

Kolhapur North By-Election Results 2022 : सतराव्या फेरीत जयश्री जाधव 2795 मते तर सत्यजीत कदम यांना 3488 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 693 मतांची आघाडी मिळाली आहे. सतराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13,096 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : 1 लाख 12 हजार 508 मतांची मोजणी पूर्ण, 66 हजार मतांची मोजणी शिल्लक

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल 26 फेऱ्यांमध्ये लागणार आहे. आतापर्यंत 1 लाख 12 हजार 508 मतांची मोजणी पूर्ण झाली असून 66 हजार मतांची मोजणी अद्याप शिल्लक आहे

Kolhapur North By-Election Results 2022 : सोळाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13,789 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By-Election Results 2022 : सोळाव्या फेरीत जयश्री जाधव 3638 मते तर सत्यजीत कदम यांना 3847 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 209 मतांची आघाडी मिळाली आहे. सोळाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13,789 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : पंधराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13,998 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By-Election Results 2022 : पंधराव्या फेरीत जयश्री जाधव 3788 मते तर सत्यजीत कदम यांना 2056 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 1732 मतांची आघाडी मिळाली आहे. पंधराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 13,998 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By-Election Results 2022 : चौदाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 12,266 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By-Election Results 2022 : चौदाव्या फेरीत जयश्री जाधव 3756 मते तर सत्यजीत कदम यांना 2669 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 1087 मतांची आघाडी मिळाली आहे. चौदाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 12,266 मतांनी आघाडीवर आहेत

Kolhapur North By-Election Results 2022 :  तेराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 11179 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By-Election Results 2022 :  महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. तेराव्या फेरीत जयश्री जाधव 4386 मते तर सत्यजीत कदम यांना 2432 मते मिळाली. तेराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 11179 मतांनी आघाडीवर आहेत


 

Kolhapur North Bypoll Results Rajesh Kshirsagar : या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मी घेणार नाही. पण शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे हे लक्षात घ्या : राजेश क्षीरसागर

Kolhapur North Bypoll Results Rajesh Kshirsagar Exclusive : या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मी घेणार नाही. पण शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे हे लक्षात घ्या. शिवसैनिक पायाला भिंगरी बांधून प्रचारात उतरले, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिली. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातून भाजप हद्दपार केली. भाजपचं हिंदुत्व बेगडी असल्याचं समोर आलं."

Kolhapur North By-Election Results 2022 : बाराव्या फेरीत जयश्री जाधव 3946 मते तर सत्यजित कदम यांना 2908 मते

Kolhapur North By-Election Results 2022 : बाराव्या फेरीत जयश्री जाधव 3946 मते तर सत्यजित कदम यांना 2908 मते मिळाली. बाराव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 9225 मतांनी आघाडीवर आहेत

Kolhapur North By-Election Results 2022 : अकराव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8187 मतांची आघाडी 

Kolhapur North By-Election Results 2022 : अकराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2870 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2756 मते. या फेरीत सत्यजीत कदम यांना 114 मतांची आघाडी. तर अकराव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8187 मतांची आघाडी 

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : दहाव्या फेरीअखेरीस आतापर्यंत जयश्री जाधव यांना 39605 मते सत्यजीत कदम यांना 31532 मते

Kolhapur North By Election Results 2022 LIVE :  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत 26 पैकी 10 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम आहे. दहाव्या फेरीअखेर आतापर्यंत जयश्री जाधव यांना 39 हजार 605 मते मिळाली आहेत, तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 31 हजार 532 मते मिळाली आहेत.

Kolhapur North By-Election Results 2022 : दहाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8073 मतांची आघाडी 

Kolhapur North By-Election Results 2022 : दहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2868 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 3794 मते. या फेरीत सत्यजीत कदम यांना 926 मतांची आघाडी. तर दहाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8073 मतांची आघाडी 

Kolhapur North By-Election Results 2022 : नवव्या फेरीत जयश्री जाधव यांना 2744 मते तर सत्यजीत कदम यांना 2937 मते

Kolhapur North By-Election Results 2022 : नवव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2744 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2937 मते. या फेरीत सत्यजीत कदम यांना 193 मतांची आघाडी. तर नवव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 8959 मतांची आघाडी 

Kolhapur North Bypoll Results Ajit Pawar Reaction : आम्हाला निवडून येण्याची अडचण वाटत नाही : अजित पवार

Kolhapur North Bypoll Results Ajit Pawar Reaction : महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासाठी तिन्ही पक्षांनी काम केलं, प्रचार केला. आम्हाला निवडून येण्याची अडचण वाटत नाही, जवळपास नऊ हजारांपेक्षा जास्त लीड आहे, यापुढच्या फेऱ्यांमध्ये आघाडी वाढत जाईल. अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रतिक्रिया देईन. निवडणूक म्हटलं तर प्रत्येक जण मनापासून प्रयत्न करतो. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्त्वाचा असतो, जनता काय कौल देईल ते आपल्याला चार तासात कळेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार दिली. 

Kolhapur North By-Election Results 2022 : आठव्या फेरीत जयश्री जाधव यांना 2981 मते तर सत्यजीत कदम यांना 3505 मते

Kolhapur North By-Election Results 2022 : आठव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2981 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 3505 मते मिळाली. आठव्या फेरीत सत्यजीत कदम 524 मतांनी आघाडी घेतली. आतापर्यंत 26 पैकी आठ फेऱ्यांमध्ये मिळून जयश्री कदम यांच्याकडे 9152 मतांची आघाडी आहे.

Kolhapur North Bypoll Results Jayant Patil Reaction : आमचा विजय होईल, याची मला खात्री : जयंत पाटील

Kolhapur North Bypoll Results Jayant Patil Reaction : आमचा विजय होईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा पुण्यात आहे. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीवर ही प्रतिक्रिया दिली.

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकूण 26 पैकी 7 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण. सातव्या फेरीअखेर जयश्री जाधव 9676 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकूण 26 पैकी 7 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण. सातव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 9676 मतांनी आघाडीवर. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 3632 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2431 मते. सातव्या फेरीत जयश्री जाधव यांना 1201 मतांची आघाडी

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : सहाव्या फेरीअखेरीस महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 8475 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : सहाव्या फेरीअखेरीस महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 8475 मतांनी आघाडीवर. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 4689 मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2972 मते, सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांना 1717 मतांची आघाडी

Kolhapur North Bypoll Results : पाचव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 6748 मतांची आघाडी

Kolhapur North Bypoll Results : पाचव्या फेरीत कदमवाडी, जाधववाडीमधील मजमोजणी पूर्ण, जयश्री जाधव यांना 3673 मते, सत्यजीत कदम यांना 4198 मते, पाचव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 6748 मतांची आघाडी

Kolhapur North Bypoll Results 2022 : चौथ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 3709 मते तर सत्यजित कदम यांना 3937 मते

Kolhapur North Bypoll Results 2022 : चौथ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 3709 मते तर सत्यजित कदम यांना 3937 मते. या फेरीत सत्यजीत कदम यांना 228 मतांचे लीड, चौथ्या फेरीअखेरीस जयश्री जाधव 7283 मतांनी आघाडीवर

Kolhapur North By Election Results 2022 Jayashree Jadhav Reaction : अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली, विजयाचं चिन्ह दिसत आहे : जयश्री जाधव

Kolhapur North By Election Results 2022 Jayashree Jadhav Reaction : "कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. विजयाचं चिन्ह दिसत आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन," अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर दिली.

Kolhapur North Bypoll Results Jayashree Jadhav Leading : तिसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 7501 मतांची आघाडी

Kolhapur North Bypoll Results Jayashree Jadhav Leading : तिसऱ्या फेरीतही जयश्री जाधव आघाडीवर आहेत. जयश्री जाधव 4928 मते, सत्यजीत कदम 2566 मते, तिसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 7501 मतांची आघाडी

Kolhapur North By Election Results 2022 LIVE : एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार, दोन फेऱ्या संपन्न, जयश्री जाधव आघाडीवर

Kolhapur North By Election Results 2022 LIVE  : एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार, सध्या दोन फेऱ्यांची मोजणी संपन्न, जयश्री जाधव यांना दुसऱ्या फेरीतही आघाडी  

Kolhapur North Bypoll Results Jayashree Jadhav Leading : दुसऱ्या फेरीतही काँग्रेसची आघाडी, जयश्री जाधव 5139 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results Jayashree Jadhav Leading : दुसऱ्या फेरीतही काँग्रेसची आघाडी. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 5515 मते तर भाजपच्या सत्यजित कदम - 2513 मते. दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव 5139 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur North By Election Results 2022 : पहिल्या फेरीत 7781 मतांची मोजणी, जयश्री जाधव यांची आघाडी

Kolhapur North By Election Results 2022 : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट 


वेळ: 8.40  


पहिल्या फेरीतील : 7781, समाविष्ट भाग: कसबा बावडा 


जयश्री जाधव - 4856 मते
सत्यजित कदम - 2719 मते


पहिल्या फेरीतील एकूण आघाडी : 2719 मते
मोजायची मते : 1,70,761

 Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : सुरुवातीला जयश्री जाधव यांची सरशी, आतापर्यंत जाधव यांना 4856 तर कदम यांना 2719 मतं...

 Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : सुरुवातीला जयश्री जाधव यांची सरशी, आतापर्यंत जाधव यांना 4856 तर कदम यांना 2719 मतं...

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : EVM मतमोजणीत जयश्री जाधव यांना 4856 मते तर सत्यजीत कदम यांना 2719 मते

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : EVM मतमोजणीत जयश्री जाधव यांना 4856 मते तर सत्यजीत कदम यांना 2719 मते. कसबा बावडाच्या एका टेबलवरील ही मते आहेत.

 Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : टपाल मतमोजणीत जाधव यांना 393 मते तर कदम यांना 439 मते

 Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : टपाल मतमोजणीत जाधव यांना 393 मते तर कदम यांना 439 मते

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : कोल्हापुरातून पहिली महिला आमदार बनण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळेल : सतेज पाटील

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : कोल्हापूरकरांचा विजय होईल. एका भगिनीला हरवण्यासाठी भाजपने लादलेली ही निवडणूक आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातून पहिली महिला आमदार बनण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळेल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : 2.90 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 2.90 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यासाठी 357 मतदान केंद्रे बनवण्यात आली होती. 2019 मध्या या जागेसाठी 51.97 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांना पराभव केला होता. शिवसेनेचे संजय मंडलिक इथले खासदार आहेत.

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : पोटनिवडणुकीत 60 टक्के मतदान

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (12 एप्रिल) मतदान झालं होतं. विधानसभा पोटनिवडणुकीच्या या जागेसाठी सुमारे 60 टक्के मतदान झालं.  काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. या पोटनिवडणुकीत एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम मैदानात उतरले आहेत.

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : पुण्यातील 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने केलेल्या 'मतदानोत्तर सर्वेक्षणातून' कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस 9 टक्क्यांच्या मताधिक्याने राखेल असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला 52 टक्के आणि भाजपला 43 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर होणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. ही निवडणूक राज्याची पुढील राजकीय दिशादर्शक ठरणार आहे.


पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली. तर भाजप कडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती निकालाची.


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले. त्यामुळे कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्याला निवडून देतील असं जयश्री जाधव यांनी बोलून दाखवलं.


कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा


- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 


- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला


- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले


- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते


- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते


महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. शिवसेनेची नाराज मते कुणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला? त्यामुळे अजूनही राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीचा अंदाज येत नाही.


निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज दुपारी साधारण बारा वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.