Ministry of Defence Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची चांगली संधी आहे.  संरक्षण मंत्रालयाने (MoD) प्रशासकीय आणि न्यायिक सदस्य पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या www. mod.qov. मध्ये आणि www.aftdelhi.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 24 पदांची भरती करण्यात आली आहे.


महत्वाच्या तारखा
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 मे 2022


'या' पदांसाठी भरती प्रक्रिया 
संरक्षण मंत्रालयाच्या 2022 मधील भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 24 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यापैकी प्रशासकीय सदस्याच्या 12 पदे आणि न्यायिक सदस्याच्या 12 पदांची भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज 2 मे 2022 पर्यंत ऑफलाइन जमा केले जातील.


न्यायिक सदस्य (पात्रता)
न्यायाधिकरण नियम 2027 नुसार, उमेदवार उच्च न्यायालयातील न्यायाधीश किंवा दहा वर्षांसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात सेवा प्रकरणांमध्ये खटल्याचा पुरेसा अनुभव असलेला वकील असावा.


वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षांपेक्षा कमी असावे.


अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. अर्ज भरून ऑफलाईन पद्धतीने पुढील पत्त्यावर पाठवू शकतात. 


अर्ज पाठवण्याचा पत्ता : 
सचिव, संरक्षण विभाग, कक्ष क्रमांक 199-सी, साउथ ब्लॉक, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली : 110011. (या पत्त्यावर 02 मे 2022 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अर्ज पाठवता येतील.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha