Viral Video : साप आणि मुंगुसाच्या लढाईबाबत आपण सर्वांनीच ऐकलं आहे. मात्र तुम्ही कधी साप आणि ससा झुंज देताना पाहिले आहेत का? नसेल तर आज आम्ही तुम्हांला साप आणि सश्याची झुंजस दाखवणार आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा ससा एका मोठ्या सापाशी लढताना दिसत आहे. दोघांची लढाई इतकी गंभीर आहे की जणू एकमेकांचा जीव घेऊनच ती संपेल असं वाटतं. मात्र छोटा ससा सापाला खडतर झुंज देत पळून जाण्यास भाग पाडतो.


हा व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर रीलच्या रुपात शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर जंगलातील असल्याचं दिसत आहे. जिथे साप आणि ससे एकमेकांशी लढताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांचा चावा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ससा सापाला पकडून पुन्हा पुन्हा इकडे तिकडे हलवू लागतो. या दोघांची झुंज इतकी गंभीर होती की यामध्ये कुणा एकाचा मृत्यू होईल असे वाटतं होते.  मात्र, शेवटी जे झाले ते पाहून प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे. हा अनोखा व्हिडीओ तुम्हीही पाहा.


व्हिडीओ येथे पाहा :





इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो युजर्सनी पाहिला आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाइक केलं आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत सशाच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha