माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, कवितेतून फडणवीसांचा हल्ला
Devendra Fadnavis : तेच मुर्ख तेच शाहणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Devendra Fadnavis : ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते ...’ या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली. वाईन विक्रीच्या निर्णायावर टीकेचा बाण सोडला. आज आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटं का होईना भाषण मांडलं. त्यांच भाषण आम्हाला ऐकायला मिळालं, असा खोचक टोलाही देवेंद्र फणडवीस यांनी लगावला.
ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर यांची कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
मद्यविक्री आघाडी सरकार –
राज्य सरकारच्या वाईन विक्री धोरणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आता मद्यविक्री आघाडी सरकार झाले आहे. राज्य सरकार केवळ टोमणे, टीका आणि आरोप करत आहे. हे महा विनाश आघाडी सरकार आहे. राज्यात क्लास बंद आणि ग्लास सुरु अशी अवस्था झाली आहे. वाईन दारु नाही म्हणता, मग वाईन पिऊन गाडी चालवू देणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. वाईनचा निर्णय आपण शेतकरी यांना मदत करण्यासाठी आपण केला अस म्हणतात मग त्यांना 50 हजार रुपयांची मदत द्यायची होती
पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात -
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कला. देशातील सर्वाधिक मुंबई महापालिका श्रीमंत आहे. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्ट्राचार आहे. हे पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. सफाई कामगिरी करणाऱ्यांनाही लुटण्याचं काम सुरु आहे. आपण मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम केले आहे. कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटामध्ये घोटाळे झाले आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या असताना आपल्याच नातेवाईकांच्या कंपनी स्थापन करुन कामं देण्यात आली. अनेक ठिकाणी कटपेस्ट करण्यांत आलंय अनेक चुका आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live