एक्स्प्लोर

घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असा निकाल; मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर : मुख्यमंत्री

मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.

मुंबई :  कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केली.  घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,  असे देखील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, घर घर मोदी म्हणायचे आता मन मन मोदी असे निकाल आता लागले आहेत. मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. मोदींना  बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदींचा करिष्मा, लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केलं . मोदींना हरवण्यासाठीइंडिया आघाडी एकत्र आली आहे.  2024 मध्ये इंडिया आघाडीचे पानिपत होईल.

राहुल गांधीनी देशात भारत जोडो आणि परदेशात भारत तोडो यात्रा केली : मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शाह यांनी केलेल्या नियोजनामुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे.  घर घर मोदी मन मन मोदी असा निकाल आपण पाहिला. हा निकाल जनतेच्या हातात असतो, आणि जनतेने मोदींना साथ दिली. मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली. 

जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री

राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.  कर्ज माफ करू असे आश्वासन दिले ते  पूर्ण केले नाही. कर्नाटकमध्ये देखील असे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे पानीपत होणार : मुख्यमंत्री

2014 मध्ये मोदींवर नको नको ते आरोप केले पण मोदी निवडून आले. 2019 मध्ये चौकीदार चोर आहे असे आरोप केले पण मोदी निवडून आले . आता मोदींविरधात देखील इंडिया आघाडी एकत्र आली आहे पण मोदी निवडून येतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे पानीपत होणार आहे. 

हे ही वाचा :

Ajit Pawar: आमचा निर्णय काहींना आवडला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Embed widget