एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : खंजीर-खंजीर करता, देव करो तुम्हाला बोधचिन्ह खंजीरच मिळो - मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar : बाळासाहेबांचे फोटो हे विचारांसाठी सर्वजण लावतात. फक्त त्यांच्या मुलानेच फोटो लावावा, हा जर हट्ट असेल तर मग उद्या शिवसैनिकांना पण त्यांचा फोटो लावता येणार नाही.

Sudhir Mungantiwar on Uddhav thackeray : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तातंतर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे (Eknath shinde)  यांनी शिवसेनेच्या (Shiv sena) 40 आमदारांसह बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Sudhir Mungantiwar) आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकेचा बाण सोडला. ज्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असं वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यावर आता भाजपकडून उत्तर दिले जाऊ लागलेय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. येता जाता खंजीर-खंजीर करता... देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय. 
 
बाळासाहेबांचे फोटो हे विचारांसाठी सर्वजण लावतात. फक्त त्यांच्या मुलानेच फोटो लावावा, हा जर हट्ट असेल तर मग उद्या शिवसैनिकांना पण त्यांचा फोटो लावता येणार नाही. कारण बाळासाहेब काही त्यांचे वडील नाही. तुमची जर ही भूमिका असेल तर मग तुम्ही मोदींचे फोटो का लावले, तुमचं काही नातं होतं का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. जो कोणी हातात भगवा घेतो तो बाळासाहेबांचा फोटो लावतो, यात दुःख व्यक्त करण्यापेक्षा आनंद व्यक्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले. ईडीचा दबाव असता तर छगन भुजबळ, संजय राऊत, राज ठाकरे, अनिल परब भाजप मध्ये आले असते, मला असं वाटतं की खोतकर साहेब हे शिंदे साहेबांसोबत शिवसेना मजबूत करण्यासाठी जात असतील. जर शरद पवार हे पितामह भीष्म असतील तर अर्जुन हा पांडवांच्या बाजू जाणारच, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

महाराष्ट्र तोडणार ही रेकॉर्ड खूप जुनी झाली आहे. हे सर्व सहानुभूती घेण्यासाठी आहे. मुंबई तोडण्याचे महापाप तर काँग्रेसचे आहे, तुम्ही अजुनही काँग्रेसच्या मांडीवर आहात.  महाविकास आघाडीतून बाहेर निघालेले नाहीत, लोकं आता यांच्या डायलॉगबाजीला कंटाळलेले आहेत. मुंबईमध्ये एकदा यांचा पराभव केल्याशिवाय यांची शब्द रचना बदलणार नाही, अशी खरमरीत टीका मुनगंटीवार यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या सामनाच्या मुलाखतीबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, ही पारिवारिक मुलाखत होती. सहज-सुलभ प्रश्न विचारत ही कौटुंबिक मुलाखत घेतली. ही एका वैफल्यग्रस्त माजी मुख्यमंत्र्याची जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेला असफल प्रयत्न होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Embed widget