Pankaja Munde Test Corona Positive : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण
Pankaja Munde Test Corona Positive : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
Pankaja Munde Test Corona Positive : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. याआधी पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्याअखेरीस पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्या घरीच उपचार घेत आहेत. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळं त्यांना भेटलेले दुसरे नेते आणि सेल्फीसाठी धडपडत जवळ येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र धडकी भरली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली माहिती अजूनच धक्कादायक आहे. अजित पवार यांनी कोरेगाव भीमामध्ये बोलताना म्हटलं आहे की, चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील 10 मंत्री (ministers), 20 आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाले आहेत. अजित दादांनी जरी 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोनाबाधित झाल्याचं म्हटलं असलं तरी आतापर्यंत कोरोना झालेल्या नेत्यांची यादी अशी आहे.
या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील