LIVE UPDATES | संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापुरात NDRF च्या 2 टीम दाखल
महत्वाच्या घडामोडी - - जगभरात 78 लाख लोकं कोरोनामुक्त तर सध्या 50 लाख अॅक्टिव्ह रुग्ण. -ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी गाईडलाइन्स जारी - वारी, गणेशोत्सवाप्रमाणे ईदही साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन - पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी? विधानपरिषदेच्या 12 जागांवरून पुन्हा राजकारण रंगणार? कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी (13 जुलै) 9 लाखांचा आकडा पार केला. मागील 24 तासात देभशभरात 28 हजार 178 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर एकूण रुग्णसंख्या 9 लाख 7 हजार 645 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात (6,498) आणि तामिळनाडू (4328) वाढले आहेत. कर्नाटकमध्ये 2,738, आंध्र प्रदेशात 1,935, उत्तर प्रदेशात 1,654, तेलंगणामध्ये 1,550, पश्चिम बंगालमध्ये 1,435, आसाममध्ये 1,001, बिहारमध्ये 1,116 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 5 लाख 69 हजार 753 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तर सध्या 3 लाख 10 हजार 377 जणांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत 23 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. हा निकालही लवकरच लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवींण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठविले आहे. यातील मुद्यांवर आपल्याला चर्चा करावी वाटल्यास आपल्याला प्रत्यक्ष भेटून या मुद्यांचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींबाबत प्रत्यक्ष माहिती देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता.