एक्स्प्लोर

Amit Shah Pune : 20 नोव्हेंबरला अमित शाह पुणे दौऱ्यावर; ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचं होणार लोकार्पण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर असणार आहे. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा त्यांंच्या हस्ते होणार आहे.

Amit Shah Pune :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येत्या 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर (Pune) असणार आहे. कै.पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या (shivsrushti) पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

अमित शाहांबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. 

1974 हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे त्रिशताब्दी वर्ष होते. यानिमित्ताने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आणि प्रदर्शनाचे आयोजन मुंबईच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना 1867 च्या एप्रिल महिन्यात सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे, या उद्देशाने 1998-99 साली शिवसृष्टीच्या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. 

आशियातील सर्वात मोठं ऐतिहासिक थीम पार्क

हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे लोकार्पण शाह करणार आहेत. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड –किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.

प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये

चार टप्प्यात तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये उत्स्फुर्तपणे देणगीदारांकडून आतापर्यंत या प्रकल्पाला मिळाले आहेत. तसेच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला सुरुवात झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget