(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Shah Pune : मोदींपाठोपाठ अमित शाह करणार पुणे दौरा; 5 आणि 6 ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रमाला लावणार हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुणे दौऱ्यावर येणार आहे. येत्या 5 आणि 6 ऑगस्ट शाह पुणे दौऱ्यावर येणार आहे.
Amit Shah Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुणे दौऱ्यावर येणार आहे. येत्या 5 आणि 6 ऑगस्ट शाह पुणे दौऱ्यावर येणार आहे. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.
नुकतेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तीने पुण्यात येऊन गेले. त्यांनी यावेळी पुणे मेट्रोचं उद्घाटनही केलं त्यानंतर लगेच अमित शाह येणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांचं पुणे शहरावर जास्त लक्ष असल्याचं दिसत आहे. एकामागून एक भाजपचे मोठे नेते पुणे दौरा करताना दिसत आहे . पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनीही पुणे शहराला महत्व दिले आहे. यामुळे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह पुण्यात येत आहे.
या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी बराच वेळ राखीव ठेवला आहे. त्यात ते कदाचित पुण्यात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची किंवा भाजप नेत्यांशीदेखील संवाद साधण्याची शक्यता आहे. पुणे पोटनिवडणुकीचा पराभवानंतर भाजपने पुण्याकडे चांगलच लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे अनेक नेते पुणे दोऱ्यावर येताना दिसतात. यापूर्वी अमित शहांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळी पुणे दौरा केला होता. RSS चे संघाचे माजी सरकार्यवाह यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ते पुण्यात आले होते.
येत्या 2024 च्य़ा निवडणुकांसाठी भाजप पुण्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर त्यांनी लगेच आपला दौरा आखला आहे. त्यातच राज्यात सत्तानाट्यदेखील बघायला मिळालं. यंदा भाजपने अजित पवारांचीदेखील साथ घेतली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यात बारामती पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा-