एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संदीप कदमांची हाक शिवसेनेने ऐकली, दीड लाखांचा धनादेश
अंबरनाथ : अंबरनाथमधील संदीप कदम या शिवसैनिकाची हाक अखेर शिवसेनेनं ऐकली आहे. 'एबीपी माझा'नं दाखवलेल्या बातमीनंतर शिवसेनेनं संदीप कदम यांना दीड लाखांचा धनादेश पाठवला आहे.
2014 साली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यासाठी डेकोरेटर असलेल्या संदीप कदम यांनी मंडप आणि कमानी उभारल्या. त्याचं 3 लाख रुपयांचं बिल पक्षानं गेल्या 3 वर्षांपासून थकवलं होतं.
दरम्यानच्या काळात अर्धांगवायूनं संदीपही अंथरुणाला खिळले. घरचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या पत्नीला घरकामं करावी लागली.
संदीप कदम शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीच, त्यांचा अंबरनाथमधील शिवसेनेशीही संबंध नाही. संदीप कदम असे आरोप करुन पक्षाला, माजी नगाध्यक्ष सुनील चौधरी आणि आमदार बालाजी किणीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हात झटकले होते.
'एबीपी माझा'नं त्यांची ही परिस्थिती दाखवल्यानंतर शिवसेनेनं त्यांना मदत केली. शिवसेनेकडून संदीप कदम यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. संदीप यांनी एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
काय आहे प्रकरण?
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 2014 साली अंबरनाथ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कमानी आणि झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. याचं काम स्थानिक शिवसेना शाखेने संदीप कदम यांना दिलं होतं. पण दौरा झाल्यानंतर, याचं तब्बल तीन लाखांचं बिल पक्षाने थकवल्याने संदीप यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे.
यातच बिलासाठी चकरा मारताना संदीपला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळं तीन मुलींच्या पालनपोषण, शिक्षणासह घरखर्च भागवण्यासाठी संदीपच्या पत्नीला घरकाम करण्याची वेळ आली आहे.
संबंधित बातम्या :
'तो' शिवसैनिक नाही, संदीप कदम प्रकरणात शिवसेनेने हात झटकले
आदित्य ठाकरेंच्या स्वागतामुळं शिवसैनिकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement