Ashish Shelar on Nawab Malik : अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्रिपुरातील अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे रझा अकादमीच्यावतीने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चा दरम्यान दगडफेकही झाली होती. या घटनेनंतर रझा अकादमीचे नाव चर्चेत आले होते. या रझा अकादमीच्या कार्यालयात भाजप आमदार आशिष शेलार काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तर, आशिष शेलार यांनीही मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे आव्हानच आशिष शेलार यांनी मलिकांना दिले आहेत.


भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दंगलीचा कट रचल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.


त्याशिवाय, मलिक यांनी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर आरोप केला. भाजप नेते आमदार आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. आशिष शेलार यांनी रझा अकादमीच्या कार्यालयात बैठक घेतली याचा फोटो प्रकाशित करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले. 


तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; शेलार यांचा पलटवार


नवाब मलिक यांना  मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या  फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.पण  त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. 


माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीनेहे फोटोचं राजकारण बंद करावे असे आशिष शेलार यांनी म्हटले.


दंगलीसाठी मुंबईतून अमरावतीत पैसे?


अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.


संबंधित वृत्त:


अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा आरोप


Amravati Violence : अमरावती दंगलीप्रकरणी अनिल बोंडेंना अटक