Pune Crime : कोंढवा अत्याचार प्रकरण; मित्रच निघाला आरोपी, तरुणीवर गुन्हा Special Report

Continues below advertisement
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोंढवा परिसरात एका तरुणीने कथित बलात्काराची खोटी माहिती दिली. २ जुलै रोजी कोंढव्यात एका डिलिव्हरी बॉयकडून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपीला पकडले. मात्र, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली. तो डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचाच मित्र असल्याचे समोर आले. तरुणीने स्वतः तिच्या मित्राला घरी बोलावले होते. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तिने नकार दिला होता, तरीही तरुणाने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे तरुणीला राग आला आणि तिने स्वतःच्याच बलात्काराचा बनाव रचला. या घटनेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते आणि पुणे पोलीस त्यांच्या बंदोबस्तात व्यस्त होते. या परिस्थितीतही पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि सत्य समोर आणले. खोटी माहिती दिल्याने पोलिसांनी तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा वेळ वाया जाऊ नये आणि प्रशासनावर ताण येऊ नये यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. २०२३ मध्ये ४१० बलात्कार आणि ७३८ विनयभंगाच्या घटना, तर २०२४ मध्ये ५०५ बलात्कार आणि ८६८ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली आहे. जुलै २०२५ पर्यंत २६९ बलात्कार आणि ४६७ विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola