Minister Rummy Row | कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची गोची, राजीनाम्याची मागणी!
माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची अनेकवेळा गोची झाली आहे. एक रुपयातल्या कृषी विम्यावर बोलताना 'भिकारीही एक रुपया घेत नाही' असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी 'सरकारच्या हातात भिकाऱ्याचा कटोरा दिलाय' असे म्हटले. यामुळे पुन्हा एकदा टीकेची झोड उठवण्याची संधी मिळाली. एक रुपयाच्या विम्यामुळे बारा तासांत पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले असेही त्यांनी सांगितले. या वक्तव्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 'मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे' अशी प्रतिक्रिया दिली. विधानपरिषदेत ऑनलाईन पत्तेखेळीच्या आरोपांवरुनही कोकाटेंवर अनेकांनी टीका केली. मात्र, सभागृहात पत्तेखेळीच्या आरोपांचा त्यांनी साफ इन्कार केला. 'राजीनामा देण्यासाठी मी काय कुणाचा विनयभंग केलाय का?' अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाची चौकशी करा असे प्रतिआव्हान देत, बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला. 'मी जर ऑनलाईन रमी खेळत असेल आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात राजीनामा देईन' असेही त्यांनी म्हटले. मोबाईलवर अचानक गेम पॉप-अप झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विरोधकांनी मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. 'ओसाडगावची पाटीलकी आहे, शेती खातं म्हणजे' असेही त्यांनी म्हटले.