Horoscope Today 23 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 जुलै 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज आषाढ अमावस्या आणि मासिक शिवरात्रीचा दुर्लभ संयोग होत असून विविध ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नका, पैसा खर्च करण्यामध्ये सुद्धा लहरीपणा जाणवेल   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल अति महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल       

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आजचा दिवस बक्षीसाचा, तर उद्याचा मेहनतीचा येणारच आहे.         

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना सर्व बाबतीत चांगले यश मिळेल, धनप्राप्ती होण्याचे योग आहेत      

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल, संशोधन क्षेत्रात प्रगती  कराल    

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज कुठे पाण्याला खळखळाट फार असतो हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.        

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या, दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे सहकार्य चांगले मिळेल   

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कामे लवकर होऊन जातील, प्रकृतीच्या बाबतीत त्वचारोगाचे प्रॉब्लेम ज्यांना आहेत, त्यांनी उपचार वेळेवर घ्यावीत       

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही विचाराच्या वाटेला जाऊ नका, आर्थिक बाबतीत चुकीचे निर्णय घेतल्यास तोटा संभवतो     

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो दीक्षित ते धोरणांचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे, तेव्हा सर्व गोष्टी पारखून घ्या           

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, बुद्धीच्या जोरावर अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प कराल        

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज संतती सौख्य चांगले मिळेल, एकमेकांचे विचार जुळल्यामुळे घरामध्ये सुसंवाद चांगला साधेल.

हेही वाचा :           

Ashadh Amavasya 2025: यंदाची आषाढ अमावस्या अद्भूत! 24 वर्षांनी एकत्र 3 राजयोगांचे दुर्मिळ संयोग, 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)