एक्स्प्लोर

महापालिकांच्या खजिन्यात कोट्यवधींचा कर, 3 दिवसात 464 कोटी जमा

मुंबई: 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यापासून तीन दिवसांत नागरिकांनी विविध करांपोटी कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. गेल्या तीन दिवसांत 465 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातच आता राज्य सरकारच्यावतीने यामुदतीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आल्याने, महापालिकेच्या खजिन्यात अजून कर जमा होणार आहे. मालमत्ताधारकांना त्यांचेकडील कराचा भरणा आणि थकबाकी जुन्या चलनाने भरता यावी यासाठी सर्व  महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांची कार्यालये रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरु ठेवली होती. यावेळी जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात विविध करांचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे. राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांकडे 13 नोव्हेंबरच्या दुपारी 5.00 वाजेपर्यंत 465 कोटी 68 लाख 83 हजार रुपये जमा झाले आहेत. यातील पुणे महापालिकेने सर्वाधिक, तर सर्वात कमी परभणी महापालिकेत जमा झाली आहे. कोकण विभागात सर्वाधिक कर हा मुंबई महापालिकेत जमा झाला असला, तरी ठाणे आणि नवी मुंबई सारख्या मोठ्या महापालिकांना मागे टाकत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे सर्वाधिक कर जमा झाला आहे. मुंबईसह कोकण विभाग (महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम रुपये लाखात)
बृहन्मुंबई महानगरपालिका 4726
ठाणे महानगरपालिका 1655
नवी मुंबई महानगरपालिका 1708
कल्याण-डोबिंवली महानगरपालिका 2893.03
मीरा-भाईंदर महानगरपालिका 1838
वसई- विरार महानगरपालिका 844.03
उल्हासनगर महानगरपालिका 2233
पनवेल महानगरपालिका 179.16
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका 892
  पश्चिम महाराष्ट्र विभाग पश्चिम महाराष्ट्र विभागात सर्वाधिक कर हा एकट्या पुणे महापालिकेत जमा झाला असून, हा आकडा राज्यातील सर्वच महापालिकांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये जमा झालेल्या कराची आकडेवारी पाहिली तर तब्बल 10 कोटीच्या आसापास असल्याचे दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिका 7265
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 5449.51
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका 1023.66
कोल्हापूर महानगरपालिका 405
सोलापूर महानगरपालिका 990
  उत्तर महाराष्ट्र
नाशिक महानगरपालिका 1432
मालेगांव महानगरपालिका 433
जळगांव महानगरपालिका 532
धुळे महानगरपालिका 744.64
अहमदनगर महानगरपालिका 491
  विदर्भ
अकोला महानगरपालिका 203
अमरावती महानगरपालिका 496
नागपूर महानगरपालिका 990
चंद्रपूर महानगरपालिका 270.15
  मराठवाडा
औरंगाबाद महानगरपालिका 494
नांदेड-वाघाळा महानगरपालिका 598
लातूर महानगरपालिका 349
परभणी महानगरपालिका 34..06
  नगरपालिका प्रशासन संचालनालय 7300.59 एकूण जमा रक्कम (लाखात) 46468.83 याप्रमाणे एकूण 464 कोटी 68 लाख 83 हजार रुपयांचा भरणा झाला आहे. दरम्यान, आता या मुदतीत अजून 24 नोव्हेंबरपर्यंत 10 दिवसांनी वाढ करण्यात आल्याने, महापालिकेच्या खजिन्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नागरीकांनी याचा फायदा घेऊन आपल्याकडील करांचा भरणा, थकबाकी जमा करावी असे आवाहन नगरविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Gadchiroli Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
Embed widget