एक्स्प्लोर
आम्हीसुद्धा भाजपमुक्त महाराष्ट्र करणार : नारायण राणे
ठाणे : या देशात लोकशाही जाऊन हुकूमशाही येत आहे. म्हणून ती संपवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आगामी निवडणुकांसाठी युती होईल, असं काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आघाडी होणार नाही, असं म्हटलं होतं. पण हे त्यांचं वैयक्तिक मत असून सोमवारी आघाडीबाबतचा निर्णय होऊ शकतो, असं राणेंनी सांगितलं.
राष्ट्रवादीसोबत युती करायची की नाही, यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक होणार आहे. बैठकीत अशोक चव्हाण, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण असे सर्व जेष्ठ नेते राहतील.
2019 ला काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असं सांगत राणेंनी भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा नाराही दिला.
पंतप्रधान मोदींवरही टीका
महात्मा गांधी यांचा फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आला. मोदींना प्रसिद्धीची प्रचंड हाव असल्याने हे झालं. पण गांधीजींशी तुलना जगात कोणाही करणार नाही, असं म्हणत राणेंनी मोदींवर टीका केली.
संबंधित बातम्या :
मुंबई जिंकण्यासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला, निरुपम यांचे तीन मुद्दे
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर, डायरीवर गांधींऐवजी मोदींचा फोटो
खादीच नाही नोटांवरुनही गांधीजी गायब होतील : अनिल विज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement