कोरोना संदर्भात सर्व उपचार निशुल्क; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
कोरोना संदर्भात सर्व उपचार आणि चाचण्या निशुल्क करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
लातूर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात होणारे उपचारनिशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार यापुढे निशुल्क होणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड-19 प्रादुर्भावास महामारी घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत. कोविड -19 बाधित रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
PPE Suit | रेल्वेच्या वर्कशॉपमध्येही बनणार पीपीई सूट!
राज्यात कोरोनाचा आकडा वाढला राज्यात आज कोरोनाच्या 394 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6817 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईचे तर पुण्यातील पाच आणि मालेगाव येथील दोन रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 301 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 117 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
Dr Shekhar Mande | कोरोना व्हायरसविरोधात कशा प्रकारे संशोधन सुरू आहे? डॉ. शेखर मांडेंशी संवाद