एक्स्प्लोर

बैलगाडा शर्यत : पेटा संस्थेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन

राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी चाकण चौकात जोरदार आंदोलन आज केलं जाणार आहे. तसंच पेटा संस्थेविरोधात राज्यव्यापी आंदोलनही छेडलं जाणार आहे.

पुणे : राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी चाकण चौकात जोरदार आंदोलन आज केलं जाणार आहे. तसंच पेटा संस्थेविरोधात राज्यव्यापी आंदोलनही छेडलं जाणार आहे. आजच्या चाकण चौकातील आंदोलनात भाजप आमदार महेश लांडगे, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासह इतर नेतेही सहभागी होणार आहेत. राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्या यासाठी सरकारनं अध्यादेश काढला होता. तसंच प्राण्यांना इजा न होता, शर्यती घ्याव्या असंही सुचवलं होतं. मात्र त्याविरोधात पेटा सामाजिक संस्थेनं न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा खीळ बसली होती. दरम्यान पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा बैलगाडा मालक चालक संघटनेची भाजप आमदार महेश लांडगे यांनी याच आठवड्यात आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. आमदार लांडगे यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी बैठक घेतली. मात्र मुख्य मुद्दा बाजूला ठेवत, बैलगाडा मालक-चालकांची मनधरणी केली आणि सरकारवर अविश्वास दाखवून त्या विरोधी आंदोलन करु नका तर न्यायालयात गेलेल्या प्राणी मित्रांविरोधात आंदोलन छेडा असं आवाहन लांडगे यांनी केलं. हे आवाहन करताना लांडगे यांच्या तोंडून प्राणीमित्रांबद्दल अपशब्दही उच्चारला गेला. काय आहे पेटा? पेटा ही एक प्राण्यांसंबंधी काम करणारी संस्था आहे. पिपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल (People for the Ethical Treatment of Animals) प्राण्यांच्या अधिकार आणि हक्कांसाठी लढणारी एक संस्था आहे. पेटा संस्थेचं मुख्यालय अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या नॉर्फोकमध्ये असून जगभरात 20 लाखांहून जास्त सदस्य या संस्थेसाठी काम करतात, असा संस्थेचा दावा आहे. इन्ग्रिड न्यूकिर्क या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पेटा या संस्थेला मलायका अरोरा, शाहीद कपूर, महिमा चौधरी, सनी लिओनीसारख्या सेलिब्रेटींनी पाठिंबा दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
Sanjay Raut: ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Raj Thackeray House Monkey: राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Embed widget