एक्स्प्लोर
Advertisement
91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात!
याआधी तीन साहित्य संमेलनं बडोद्यात आयोजित झाली असली, तरी 91 साहित्य संमेलन हे विशेष ठरेल. कारण स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात आयोजित होणरं हे पहिलं साहित्य संमेलन ठरणार आहे.
नागपूर : 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता बडोद्यात होणार आहे. बुलडाण्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या वादानंतर प्रस्ताव मागे घेतला होता. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून बडोद्याची घोषणा करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात 91 वं साहित्य संमेलन हे बडोद्यातील चौथे संमेलन असेल. यापूर्वी 1901 साली सातवे संमेलन, 1921 साली अकरावे संमेलन आणि 1934 साली विसावे संमेलन बडोद्यात आयोजित करण्यात आले होते.
बडोद्यातील यापूर्वीची संमलेन आणि अध्यक्ष :
- 1901 (सातवं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – का. र. कीर्तीकर
- 1921 (अकरावं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – न. चिं. केळकर
- 1934 (विसावं संमेलन) : संमेलनाध्यक्ष – ना. गो. चापेकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement