एक्स्प्लोर
अकोला जिल्हा क्रीडा संकुलात जिम्नॅस्टिक कोचकडून लैंगिक शोषण?
अकोला : अकोल्यात एका क्रीडा संकुलात घृणास्पद घटना घडली आहे. जिम्नॅस्टिक प्रशिक्षकानं क्रीडा संकुलातल्या लहानग्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे आता अकोल्यात पालकांचीही चिंता वाढली आहे.
अकोल्यातल्या जिल्हा क्रीडा संकुलात चालणाऱ्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रात आरोग्याचे धडे दिले जातात. मात्र याच ठिकाणी जिम्नॅस्टिकच्या प्रशिक्षकानंच घृणास्पद कृत्य केलं. अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुकेश तुंडलायत या प्रशिक्षकावर आहे.
धक्कादायक बाब म्हणजे 4 वर्षांपासून या प्रशिक्षकाचं दुष्कृत्य सुरु आहे. जिल्हाधिकारीही या क्रीडा संकुलात रोज येतात. पीडित मुलांनी हा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला आणि मुकेश तुंडलायतचा बुरखा फाटला.
मुलांनी आपल्याकडे तक्रार केल्यानंतर मी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन पोलिस तक्रार करण्यास सांगितलं. त्यानंतर गुन्हा दाखल झाला, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपी प्रशिक्षक मुकेश तुंडलायतची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
मुकेश तुंडलायतचा याआधीचा रेकॉर्डही खराब आहे. एका शाळेत क्रीडा शिक्षक असताना तिथंही अशाच कृत्यामुळं त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकी पेशालाच बदनाम करणाऱ्या अशा शिक्षकांच्या विकृतीलाच ठेचण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे कुठलाही शिक्षक असं दुष्कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement