एक्स्प्लोर
काळ्या मातीत मातीत...जिल्हाधिकाऱ्यांचं तिफन चालतं!
आस्तिककुमार पाण्डेय यांनी थेट तिफन हातात धरत पेरणीचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांनी पेरणीचं 'सरतं' हातात धरत त्यांना साथ दिली.
अकोला: अकोला जिल्ह्यात सध्या पेरणीची लगबग सुरु आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे मंगळवारी एका वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळाले.
आस्तिककुमार पाण्डेय यांनी थेट तिफन हातात धरत पेरणीचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांनी पेरणीचं 'सरतं' हातात धरत त्यांना साथ दिली.
मूर्तिजापूर तालुक्यातील सोनाळा गावात या दोघांनीही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणीचा आनंद घेतला. पेरणीचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसह सेल्फीही घेतली.
आस्तिक कुमार पाण्डेय यांची ओळख 'शेतकरी जिल्हाधिकारी' अशी झाली आहे. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी शेतीचा यशस्वी प्रयोग केला. यातून त्यांनी आपलं शासकीय निवासस्थान स्वयंपूर्ण केलं. शिवाय काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना वेळेत पीककर्जाचं वाटप न करणाऱ्या अॅक्सिस बँकेला झटका दिला होता.
पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकेला दणका
पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या अॅक्सिस बँकेला अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. या बँकेतील 45 कोटींच्या शासकीय ठेवी तडकाफडकी काढण्यात आल्या. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 18 जूनपर्यंत पीक कर्ज वाटप पूर्ण करण्याचा अल्टिमेटम बँकांना दिला होता.
मोर्णा नदी स्वच्छतेसाठी लोकचळवळ
अकोल्याची जीवनवाहिनी म्हणून मोर्णा नदीची ओळख आहे. मात्र गटारगंगा झालेल्या मोर्णेला स्वच्छ करण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हाक दिली. आणि पाहता-पाहता ही लोकचळवळ झाली. प्रत्येक शनिवारी अकोलेकर मोर्णा तीरावर येत नदीपात्र स्वच्छ करायला लागले. या तीन महिन्यात तब्बल सात किलोमीटर नदीपात्राची स्वच्छता लोकसहभागातून झाली. या अभियानाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात घेत मोहिमेचं कौतुक केलं होतं.
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या दहा एकरावरील शासकीय निवासस्थानी शेती करीत नंदनवन फुलवलंय. आपल्या शेतीतून जिल्हाधिकारी निवासस्थान आज स्वंयपूर्ण झालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना आनंदाची नवी पाऊलवाट दाखवणारी एका हिरव्या मनाच्या अधिकाऱ्याची शेती आहे.
VIDEO
712 अकोला: कर्जवाटपात दिरंगाई, जिल्हाधिकाऱ्यांची बँकांवर कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement