एक्स्प्लोर
पूर्वी 50 लाखांत आमदार फुटायचा, आता नगरसेवकही फुटत नाही : अजित पवार
करमाळा (सोलापूर) : पूर्वी 50 लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवक देखील फुटत नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य करुन अजित पवार यांनी पुन्हा एकदा राळ उडवून दिली आहे. करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
"फुटीरांना तिकिटं देऊ नका"
महापालिका आणि नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत बेडूकउड्या सुरु आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी फुटीरांना तिकीटं देऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी सर्वपक्षीयांना केलं.
मुख्यमंत्र्यांवरही निशाणा
सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणावर असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीसांच्या नरेंद्र महाराजांच्या दरबारातील हजेरीवर टीकास्त्र सोडलं आहे.
गुन्हेगारी वाढणं, हे मुख्यमंत्र्यांचं अपयश
बलात्काऱ्याला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करताना राज्यातील गृह विभाग पुर्णपणे अपयशी असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली. बलात्कार, गुन्हेगारी वाढली असून पोलिसांवर हल्ले वाढले आहेत, हे सारं मुख्यमंत्र्यांचे अपयश असल्याची टीका अजित पवारांनी केली.
अजित पवारांकडून आचारसंहितेवर आक्षेप
जिथे निवडणुका आहेत, तेथेच आचारसंहिता लागू करावी. अन्यथा विकासकामे मार्गी लागतील, अशी सूचना अजित पवार यांनी केली. आचारसंहितेबाबतच्या चुकीसंदर्भात मागणी करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, करमाळा आणि माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement