एक्स्प्लोर

मोठी बातमी: पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी मंजूर, अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता

या आराखड्यानुसार काम करताना स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व आणि मूळ वास्तूशैली जपली जाणार आहे.

Mumbai:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी 32 लाखांचा खर्च केला जाणार आहे. या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे. या कामांची अंमलबजावणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिले आहेत. 

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त यावर्षी 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे झाली होती. त्यात या स्मृतीस्थळाच्या जतन आणि विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर केवळ दोन आठवड्यांतच नियोजन विभागाने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार काम करताना स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व आणि मूळ वास्तूशैली जपली जाणार आहे. तसेच ही कामे केवळ पुरातत्व आणि इतिहासाची जाण असलेल्या व्यक्तींमार्फतच केली जाणार आहेत. काही कामे केंद्र सरकारच्या PRASAD आणि स्वदेश दर्शन योजनांतर्गत केली जातील.

प्रशासकीय मंजूरीचा  शासननिर्णय जारी

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधीत आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून  6 मे 2025 रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजूरीचा  शासननिर्णय आज जारी केला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज शासननिर्णय जारी केला. या शासननिर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
Embed widget