एक्स्प्लोर

Ajit Pawar : हे आहेत राज्याचे आतापर्यंतचे 15 उपमुख्यमंत्री... नाशिकराव तिरपुडे ते अजित पवार, अशी आहे यादी

List Of Deputy CM of Maharashtra : अजित पवारांनी आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 

मुंबई: राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी (Ajit Pawar) आतापर्यंत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक विक्रमच केला आहे. राज्यात प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री नेमण्यात आले नव्हते. पण वसंतदादा पाटील मुख्यमंत्री (Vasantdada Patil) झाल्यानंतर म्हणजे 1978 साली राज्याला नाशिकराव तिरपुडे यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री मिळाला आणि बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज्यामध्ये उपमुख्यमंत्री नेमण्यात आले.

राज्यात आतापर्यंत एकून 15 वेळा उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. जाणून घेऊया त्याचा इतिहास,

नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस) - 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 
वसंतदादा पाटील राज्याजे मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते.

सुंदरराव सोळंके (काँग्रेस)- 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 
शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते. 

रामराव आदिक (काँग्रेस)- 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 
वसंतदादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर रामराव अदिकांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

गोपीनाथ मुंडे (भाजप) - 14 मार्च 1995 ते 18 ऑक्टोबर 1999 
राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी युती सरकारमध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. 

छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 
काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना छगन भुजबळांनी दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.  

विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 25 डिसेंबर 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री होते. 

आर आर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 
विलासराव देशमुख राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आर आर पाटलांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) - 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2010 
अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)- 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 
काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 7 डिसेंबर 2012 ते 28 सप्टेंबर 2014 
काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 
भाजपचे देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा केला. त्यावेळी अजित पवारानी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 30 डिसेंबर 2019 ते 29 सप्टेंबर 2022 
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनच्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांना चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.

देवेंद्र फडणवीस (भाजप) - 30 जून 2022 ते आतापर्यंत 
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 2 जुलै 2023 पासून आतापर्यंत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget