एक्स्प्लोर

शेतीसह उद्योग सहकार शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात स्वतंत्र AI प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करा, अजित पवारांचे निर्देश

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे (AI) स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

Ajit Pawar : शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे (Artificial Intelligence) स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी असे ते म्हणाले. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.  कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या
मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत असल्याचे पवार म्हणाले. 

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन होणार

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला असून एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता, डिजिटल साक्षरता वाढणार आहे. नोयडातील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगुलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून शहरात आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. 

बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक व कृषी तज्ञ सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर आदींसह शेती, उद्योग, व्यापार, माहितीतंत्रज्ञान, कौशल्यविकास आदी क्षेत्रातील तज्ञ तसेच शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेती, उद्योग, व्यापार, सहकार या क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची

विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टीफिशिएल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रीम बुद्धीमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरु करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटील कौशल्यवृद्धी, संशोधन केंद्रे सुरु करणे, कर्करुग्णांवरील उपचारप्रक्रियेत वापरले जाणारे मायक्रोसॉफ्टचे इ-संजीवनी तंत्रज्ञान बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, राज्यातील अन्य रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्य शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. सर्वांना शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.

महत्वाच्या बातम्या:

AI in Agriculture: 'एआय'चा वापराने ऊसाचे आता एकरी 104 ते 150 टनापर्यंत उत्पादन; अत्याधुनिक AI करतं तरी काय?

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget