एक्स्प्लोर

मोठी बातमी : उदयनराजेंना अजित पवारांची 'घड्याळा'ची ऑफर, पण राजे कमळावरच ठाम; नेमकं काय घडतंय?

Lok Sabha Election 2024 : उदयनराजे हे भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. 

Lok Sabha Election 2024 : महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची (Satara Lok Sabha Constituency) जागा भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीसाठी (NCP) डोकेदुखी ठरत आहेत. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या भुमिकेवर अजित पवार (Ajit Pawar) ठाम आहे. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशा प्रस्ताव अजित पवारांनी दिला आहे. मात्र, उदयनराजे हे भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहे. मात्र, भाजपकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असलेल्या उदयनराजे भोसले यांनी काल रात्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे आता अमित शाह यावर काही तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, अजित पवार गट साताऱ्याची जागा सोडण्यासाठी तयार नाही. 

उदयनराजेंना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव 

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे महायुतीत देखील या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला गेला आहे. अशात उदयनराजे भोसले भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण, अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपची कोंडी झाली आहे. अशात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांकडून देण्यात आला आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाची आहे. 

उदयनराजे भोसले कमळावरच ठाम...

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे, पण कोणत्या पक्षाकडून लढणार यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. उदयनराजे भोसले जर येथून निवडणूक लढवणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपनेच लढवावी यावर उदयनराजेही ठाम आहेत. यासाठी उदयनराजे तीन दिवसांपासून दिल्लीत आहे. त्यामुळे आता उदयनराजे कमळावर की राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यानंतरचा सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

एकेकाळी आम्ही त्यांना घरी जाऊन उमेदवारी दिली, आज काय करतायत? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर बोचरा वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget