एक्स्प्लोर
अजित पवारांनी अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेलं!
अजित पवार यांनी स्वतः रुग्णालयात फोन केला आणि डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.
सातारा : महाबळेश्वरमधील पाचगणीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील माणुसकी पहायला मिळाली. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संतोष जाधव नामक व्यक्ती महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसली. त्यावेळी अजित पवारांनी आपल्या गाडीतून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले.
संतोष जाधव हे दुचाकीवरुन जात असताना रानडुक्कराने अचानक धडक दिल्याने रस्त्यावर निर्जन ठिकाणी अपघात होऊन ते पडले होते. त्याच रस्त्याने महाबळेश्वरवरुन एक विवाहसोहळा आटोपून जाणाऱ्या अजित पवार यांना ते दिसले.
अजित पवार यांनी तातडीने स्वतःची गाडी थांबवून जखमी अवस्थेत असलेल्या संतोष जाधव यांना आपले युवा कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून स्वतःच्या गाडीमधून सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथे पोहोचवले. त्यानंतर स्वतः फोनवरुन डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. एकूणच अजित पवारांच्या माणुसकीचे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने दर्शन झाले.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement