Ajit Pawar : राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देणार, दिल्लीत निवडणूक लढवणार; अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar On Maharashtra CM : भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि आपल्या पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
दिल्ली : राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. आपल्याला पक्ष पुढे घेऊन जायचा असून लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांनाही अजितदादांनी टोला लगावला.
आज मुख्यमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत मीटिंग आहे. भाजपचा जागा जास्त असल्यामुळे अमित शाह आणि मोदी त्याबाबत निर्णय घेतील असं अजित पवार म्हणाले. भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे, आम्ही देखील पाठिंबा दिला आहे असंही अजित पवारांनी सांगितलं.
राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवणार
अजित पवार म्हणाले की, "आपल्याला आता आपला पक्ष पुढे घेऊन जायच आहे. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबरनंतर घेणार आहोत. त्या आधी जे बदल करायचे आहेत ते नक्की करूयात. आपण तरुणाना संधी देणार आहोत महिलाना संधी देणार आहोत."
प्रत्येक राज्यात आपण आपले आमदार निवडून आणत आहोत. महिलांना देखील आपण कशी संधी देऊ शकतो याचा देखिल आमचा प्रयत्न असणार आहे. लोकसभेला यश मिळालं नाही मात्र कार्यकर्ता हरला नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आपले उमेदवार 1 लाख,80 हजार मर्जिनने जिंकलो असं अजित पवार म्हणाले.
ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर अजित पवारांनी टीका केली. ते म्हणाले की, "आता विरोधक म्हणत आहेत की ईव्हीएम मधे घोटाळा आहे. असं कसं काय? लोकसभेला जागा निवडून आल्या त्यावेळी अडचण नव्हती आता मात्र ईव्हीएम वर शंका उपस्थित करत आहेत. विधानसभेला आलेल्या अपयशामुळे अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत."
दिल्लीत निवडणुका लढवणार
अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्र आधी नागालँड मधे देखील आम्ही यश मिळवलं होतं. आमचा उपाध्यक्ष तिथं आहे. अरुणाचल प्रदेशमधे देखील 3 आमदार निवडून आले आहेत. आम्हाला 3 राज्यात यश मिळाल आहे. अजून पुढे देखील यश प्राप्त करायचं आहे. आम्हाला आता दिल्लीत देखील निवडणूक लढायची आहे. आम्ही नक्कीच इथं आमच खातं खोलू."
ही बातमी वाचा: