एक्स्प्लोर

पूनम महाजन, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्यानं का मारलं?, अजित पवारांचा सवाल

आपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती, पवारसाहेब आणि प्रमोद महाजनांचे संबंध कसे होते आणि या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्यावं असं सांगताना जर आम्ही म्हटलं की तुझ्या बापाला चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे,

बारामती : खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. 'तुम्हाला बोलता येतं, तसं आम्हाला ही बोलता येतं, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्यानं का मारलं? हे महाभारत कसं घडलं? कशामुळे घडलं हे विचारलं तर?, असे सवाल करत अजित पवार यांनी पूनम महाजनांवर जोरदार टीका केली. पूनम महाजन यांनी शरद पवार हे शकुनी मामा आहेत, अशी टीका केली होती. यावरून पवार यांनी या कार्यक्रमात त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
आपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती, पवारसाहेब आणि प्रमोद महाजनांचे संबंध कसे होते आणि या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्यावं असं सांगताना जर आम्ही म्हटलं की तुझ्या बापाला चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे, असा सवाल अजित पवारांनी केला.
आपली राजकीय कारकीर्द किती? आपण बोलतो किती? याचं भान न ठेवता पूनम महाजन यांनी आमच्या दैवतावर टीका केली. महाजन कुटुंबात भलं मोठं महाभारत का घडलं. याचं उत्तर त्यांना देता येईल का? असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही पातळी सोडत नाही, याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बारामती तालुक्यातील कुरणेवाडी या गावी विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.
अजित पवारांचा शिवसेनेवर घणाघात
ज्यांना खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ असे म्हणणारे आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे असे म्हणत आहेत. मतांवर डोळा ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न हे शिवसेनावाले करत असल्याचा घणाघाती आरोप अजित पवारांनी केला आहे.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करणारे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाची भाषा करत आहेत. मात्र तेच लोक मुंबईत राहून कधीच शिवजयंतीला किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाला जात नाहीत असा टोला अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget