अजय बारस्कर धमकी प्रकरण, अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद, लवकरच मराठवाड्यात उपोषण करणार
अजय बारस्कर (Ajay Barskar) यांना अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या धमकीबाबत त्यांनी आज अहमदनगरच्या (Ahmednagar) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
Ajay Barskar : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना विरोध करणारे अजय बारस्कर (Ajay Barskar) यांना अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या धमकीबाबत त्यांनी आज अहमदनगरच्या (Ahmednagar) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जी भूमिका मांडली तेव्हापासून आजपर्यंत अज्ञात इसमांकडून धमक्या येत असल्याचं बारस्कर यांनी म्हटलंय. दरम्यान, आपण लवकरच मराठवाड्यात जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा देखील बारस्कर यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांनी माझ्यासमोर येऊन खुली चर्चा करावी, असा आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कोट्यवधी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणापत्र मिळाले असल्याचे जरांगे सांगतात, पण ते खोटं आहे असा दावा देखील बारस्कर यांनी केलाय.
बारस्कर यांनी घेतली मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका
अजय बारस्कर यांची पंढरपूरमध्ये गाडी जाळली होती. त्यानंतर ते आक्रमक झाले होते. त्यांना धमकीचे फोन येत होते. त्यानंतर आय त्यांनी एसआऐयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चर्चेत आले होते. त्यानंतर अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूर येथे जळाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
कोण आहेत अजय बारस्कर?
अजय बारस्कर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालगावचे रहिवासी आहेत. एका वारकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून, त्याचं वय हे साधारण 45 वर्ष आहे. बीए पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. तर नगरच्या विखे पाटील कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनीयरींगच्या डिप्लोमा केला आहे. तसेच नगरच्या सीएसआरडी कॉलेजमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा देखील केलाय. 2014 मध्ये बारस्कर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी 6003 एवढी मतं मिळाली होती. या निवडणुकीत भाडपचे उमेदवरा दिलीप गांधी विजयी झाले होते. बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या आंदोलनातही सहभागी झाले होते. जरांगे यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण 2006 पासून प्रयत्नशिल असल्याची माहिती बारस्कर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
Pune Ajay Baraskar : अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही; देहू संस्थानाचा खुलासा