एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नगरमधील देहविक्रेत्या महिलांची केरळच्या पूरग्रस्तांना मदत
अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिलांनी केरळमधील पूरग्रस्तांना 21 हजार रुपयांची मदत करत खारीचा वाटा उचलला आहे.
अहमदनगर : केरळमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, तसचं हजारो जण बेघर झाले. देश-परदेशातून केरळवासियांना मदतीचे हात पुढे येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिलांनीही मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे.
देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपल्या एक दिवसाची कमाई म्हणजे 21 हजार रुपये मदत म्हणून दिली. एकूण एक लाख रुपये जमा करुन देण्याचा संकल्प या महिलांनी केला आहे.
केरळमध्ये आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला, तर हजारो जण बेघर झाले. समाजाने उपेक्षित मानलं असलं तरी या महिलांनी माणुसकी दाखवत केरळच्या मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे.
देहविक्रेत्या महिलांनी आपली एक दिवसाची कमाई म्हणून 21 हजार रुपयांचा धनादेश उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. इतकंच नाही तर यापुढे एक लाख रुपये जमा करुन केरळवासियांना मदत म्हणून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे समाजाकडून दुखावलो जरी असलो तरी कर्तव्याची भावना मनात धरुन देहविक्री करणार्या महिलांनी केरळसाठी केलेली मदत इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, असंच म्हणावं लागेल.
संबंधित बातम्या :
केरळला यूएईने देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्राने नाकारली!
1 लाख गायी, 4 लाख कोंबड्या वाहून गेल्या, केरळचे 20 हजार कोटी पाण्यात
उद्ध्वस्त केरळला यूएईकडून 700 कोटींची मदत
केरळमधील जलप्रलय 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' जाहीर
उद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचं सावट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement