एक्स्प्लोर
श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचा सामूहिक विवाहसोहळा
अहमदनगर : श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप नुकतेच विवाहबंधनात अडकले. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे आमदार असूनही जगतापांनी सामुदायिक विवाहसोहळ्यात गाठ बांधली. राहुल जगताप यांच्याच मंडपात आणखी 9 जोडपी विवाहबद्ध झाली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले राहुल जगताप यांचं लग्न भव्य होतं. पण त्या लग्नाला समाजभानाची किनार होती. त्यामुळे दानवेंच्या मुलाच्या लग्नाप्रमाणे यात बडेजावाचा भपका नव्हता.
या लग्नालाही नेत्यांची फौज उपस्थित होती. पण इथे ना स्पेशल विमानं आली, ना हेलिकॉप्टर भिरभिरले. ना व्हीआयपींसाठी वेगळ्या पंगती उठल्या. आशीर्वाद द्यायला हजारो माणसं आली आणि त्यांच्या आशीर्वादानं 9 जोडपी गहिवरली.
आपला मंडप उजळत असताना, गरीबाघरचा दिवाही दिसणार नाही, असा भपका काय कामाचा? त्याच गरीबाघरच्या दिव्यासह उजळण्यात वेगळं समाधान आहे. जे आपल्या बड्या नेत्यांना अजूनही कळत नाही, का असा सवाल वारंवार उपस्थित होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement