एक्स्प्लोर

भाजी विकण्यासाठी धरली शहराची वाट, पण रस्त्यातच काळाचा घाला; बळीराजाचं अख्ख कुटुंब क्षणात संपलं

भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा  पीकअप  आणि  कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला.  

मुंबई : अहमदनगर कल्याण महामार्गावर (Ahmednagar Kalyan Highway) माळशेज घाटाजवळ (Malshej Ghat)  भीषण अपघात (Accident News)  झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.  या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत.

भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा  पीकअप  आणि  कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला.  डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत  रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक स्वतः  आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी,  मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला. 

बळीराजाच्या कुटुंबावर काळाचा घाला

भाजीचा  पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की,  या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील  एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. 

अपघातातील ओळख पटलेल्या पीकअपमधील मृतांची नावे 

1) गणेश मस्करे वय.30 वर्ष (चालक मयत)
2) कोमल मस्करे वय.25 वर्ष (चालकाची पत्नी)
3) हर्षद मस्करे वय.4 वर्ष (चालकाचा मुलगा)
4) काव्या मास्करे वय .6 वर्ष (चालकाची मुलगी) सर्व रा. मड.तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
5) अमोल मुकुंदा ठोखे राहणार.जालना व 

रिक्षातील मृतांची  नावे

1) नरेश नामदेव दिवटे वय 66 वर्ष (रिक्षा चालक)रा. पेडे परशुराम तालुका चिपळूण जि.रत्नागिरी

इतर दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात

पुणे-नाशिक (Pune- Nashik Highway)  महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर  असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर  रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे.  मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnna Bansode Vidhansabha Deputy Speaker: अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी,प्रस्ताव एकमताने समंतNagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
Embed widget