मोटारसायकलवरुन चार जण गेले वाहून, दोघांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं शिर्डी हादरलं
सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Hevy Rain) सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शिर्डीत देखील जोरदार पाऊस सुरु आहे.
Ahilyanagar News : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Hevy Rain) सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शिर्डीत देखील जोरदार पाऊस सुरु आहे. शिर्डित अतिवृष्टीने दोन जणांचा बळी घेतला आहे. शिर्डी साकुरी शिवारनगर मनमाड महामार्गालगत ओढ्यातील पाण्यात बुडाल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे.
काल मध्यरात्री चार जण वाहून गेले होते
काल मध्यरात्री चार जण वाहून गेले होते. या वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, दोघांचा मृत्यू झाला. प्रसाद पोपटराव विसपुते कोपरगाव व रोहित खरात अशी दोन मृतांची नावे आहेत. तीन मोटारसायकल वरुन चार जण काल वाहून गेले होते. .
खटाव तालुक्यात पुराच्या पाण्यात एक जण गेला वाहून
खटाव तालुक्यात पुराच्या पाण्यात एक जण गेला वाहून गेल्याची घटना घडली. वाहून गेलेल्या व्यक्तीचा NDRF टीम कडून शोध सुरु झाला आहे. रेसिक्यु टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व टीम घटनास्थळी तळ ठोकून आहे. खटाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेला असल्याची घटना काल घडली होती. सध्या तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून नदी पात्रात मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह NDRF रेसिक्यु टीम घटनास्थळी शोध घेत आहे. पोलिस प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत आहे. काल अंबवडे गोरेगाव रस्त्यावरील असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते, यावेळी एक जण त्या पुलावरून जाण्याचे धाडस करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेला होता. सुरेश रघुनाथ गायकवाड, अंबवडे येथील रहिवाशी असल्याचे समोर आले होते. दरम्यान आज घटनास्थळी रेसिक्यु टीम , पोलिस, तलाठी, पोलिस पाटील, व शासकीय यंत्रणा पोहचली असून शोध कार्य सुरू आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:























