टायर फुटल्याने ट्रॅक्टर 200 फूट खोल दरीत कोसळला, शेतकऱ्याचा मृत्यू तर 1 जण गंभीर
संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडी नजीकच्या 200 फूट खोल दरीमध्ये ट्रॅक्टर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये तुकाराम गोविंद घुले या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Ahilyanagar Accident News : संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडी नजीकच्या 200 फूट खोल दरीमध्ये ट्रॅक्टर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये तुकाराम गोविंद घुले या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हा शेतकरी गंभीरित्या जखमी झाला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे 200 लिटर पाण्याचा बॅरल घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा टायर फुटून ट्रॅक्टर 200 फूट दरीत कोसळला. परिसरात ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. वाड्यावर त्यांकडे जाणारी रस्ते स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही खराब असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशातच पाण्यासाठीही वणवण करावी लागते. पाणी हेच जीवन असलं तरी पाण्याच्या बॅरल घेऊन जात असताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. विविध कारणामुळं अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये चांगल्या पद्धतीचे रस्ते नसने हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. राज्याच्या अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळं देखील अपघात होत आहेत.
राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई, 580 टॅकरने पाणी पुरवठा
राज्यात पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये 580 टॅकरने पाणी पुरवले जात आहे. पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यात किंवा त्या भागात स्वत:जाऊन पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यात 447 गावे व 1342 वाड्यांमध्ये 580 टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न असून 192 टॅकर सुरू असल्याची शासनाची माहिती दिली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत ती कमी आहे मागचा वर्षी अडीच हजारहून अधिक टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत होता असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. हा आकडा आता 580 वर आहे. मात्र यावरही मी समाधानी नाही. काही ठिकाणी पाणी टंचाईबाबत चुकीची माहिती पसरवत शासनला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
अचानक एसटीचा ब्रेक फेल, चालकाने दाखवले प्रसंगावधान, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले 51 जणांचे प्राण























