एक्स्प्लोर

Dhananjay Munde : शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच 10 हजार जमा होणार; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा  

Dhananjay Munde : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार जमा होणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली आहे.

Dhananjay Munde : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसहाय्या वितरीत होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच (सोमवार, 30 सप्टेंबर) 10 हजार जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र कृषि विभाग कडून सन 2010, 2021 आणि 2022 या वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि  अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर,कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत वरळी डोम येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.  

कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात घोषणा

राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानं पैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. यात प्रति हेक्टरी 5000 आणि 2 हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त 10,000 अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी चे वितरण होणार आहे. यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आनंदात माझा आनंद आहे. मी उपमुख्यमंत्री अजित दादांचे आभार मानतो, की दादा तुम्ही माझ्यावर सगळ्यात कमी वयात कृषिमंत्री पदाची जबाबदारी टाकली. या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने आणल्या. महाराष्ट्र सगळ्यात चांगले कृषि राज्य हे शेतकर्‍यांमुळेच असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. 

सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात जालना जिल्ह्याची बाजी

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून 52067 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (24526 अर्ज), परभणी (15.43अर्ज), छत्रपती संभाजीनगर (6888 अर्ज) आणि हिंगोली (5079अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ 10 टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरतीDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 December 2024Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget