एक्स्प्लोर

Agniveer Scheme : अग्निवीर भरती मेळावा; कोल्हापूर शहरात वाहतूक मार्गात बदल

 कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून लाखांवर तरुणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

Agniveer Schemeकोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून लाखांवर तरुणांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. भरतीला येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी 200 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल त्याप्रमाणे उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येईल. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतील. 

या पार्श्वभूमीवर 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. भरती प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहेत. भरतीकरिता येणारे उमेदवार त्यांच्या खासगी वाहनाने, एसटी बस, रेल्वेने येणार असून, वाहनांची व लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.  

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग

  • सायबर चौक, एनसीसी भवन ते एस.एस.सी. बोर्डपर्यंत इंदिरा सागर चौकाकडे जाणारा मार्ग केएमटी बस व ऑटोरिक्षा वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना प्रवेश बंद.

वळविण्यात आलेले मार्ग 

  • सायबर चौकातून शेंडा पार्क, हॉकी स्टेडियमकडे जाणारी वाहने ही सायबर चौकातून एसएससी बोर्ड चौकापर्यंत, तसेच एसएससी बोर्डकडून सायबर चौकाकडे येणारी जाणारी वाहने ही एकेरी मार्गानेच ये-जा करतील.

वाहतुकीसाठी बंद व सुरू करण्यात येणारे मार्ग 

  • राजाराम रायफल्स ते प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमार्गे सायबर चौक येणारा मार्ग हा राजाराम रायफल्स चौकात वाहतुकीसाठी सोयीनुसार बंद व सुरू करण्यात येईल (स्कूलबस, विद्यार्थी वाहतूक रिक्षा, भरती प्रक्रियेकरिता येणारी वाहने वगळून)

पार्किंग व्यवस्था व मार्ग

भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या बाजूच्या रस्त्याने, सारथी इमारत येथून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात पार्क करावीत. उमेदवार अवजड वाहनांतून आल्यास त्यांनी वाहनांनी राजाराम महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात वाहने पार्क करावीत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget