एक्स्प्लोर
अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही भागात आलेल्या या महापुराने पुरती दाणादाण उडवली आहे. पण या अस्मानी संकटासोबतच आणखी एक संकट आता आ वासून उभं राहणार आहे ते झपाट्याने पसरणाऱ्या रोगराईचं. या संकटापासून वाचण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

मुंबई : पुराच्या पाण्याने वेढलेला हा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही तालुके. गावाच्या किंवा शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, चहूबाजूला पाण्याचंच साम्राज्य दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गडचिरोलीतील काही भागात आलेल्या या महापुराने पुरती दाणादाण उडवली आहे. पण या अस्मानी संकटासोबतच आणखी एक संकट आता आ वासून उभं राहणार आहे ते झपाट्याने पसरणाऱ्या रोगराईचं. या संकटापासून वाचण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणती काळजी घ्याल? - शक्य असल्यास कोरडे कपडे घालावेत - मधुमेहाच्या रुग्णांनी या पाण्यात उतरणं टाळावं - विनाकारण पुराच्या पाण्यात जाऊ नका - वीजेच्या तारांना स्पर्श करु नका - पाणी 15 ते 20 मिनिटं उकळवून प्या - मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साचू देऊ नका - शिजवलेलं ताजं अन्न खा - भिंतीवर निर्माण झालेलं शेवाळं खरवडून काढून टाका रोगराईच्या या संकटापासून स्वतःचा बचाव करणं हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे काळजी घ्या हेच पूरग्रस्त नागरिकांना एबीपी माझाचं आवाहन आहे.
आणखी वाचा























