भिंडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज ठाकरेंची महात्मा गांधीवरील 'ती' पोस्ट मनसेनं पुन्हा केली रिशेअर
Raj Thackeray On Mahatma Gandhi : आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यापर्यंत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे.
Raj Thackeray On Mahatma Gandhi : आंबे खाण्यापासून ते टिकली लावण्यापर्यंत ते पार राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यापर्यंत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भिडे यांच्या त्या वक्तव्याविरोधात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियातूनही नेटकरी चांगलाच समाचार घेत आहेत. विरोधकांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. आता यामध्ये मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेने ट्वीट करत संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी गेल्यावर्षी महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेली एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे.
मनसेच्या त्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 2 ऑक्टोबर 2022 रोजी राज ठाकरे यांनी 'महात्मा गांधी' यांच्यावर एक अप्रतिम अभिवादनपर पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट आता पुन्हा एकदा रिशेअर करण्यात आली आहे. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसतानाही गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.
मनसेने रिशेअर केलेल्या त्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंच्या त्या पोस्टवर अल्पावधीतच कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पडत आहे. मनसेच्या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केले आहे.
राज ठाकरेंनी 2 ऑक्टोबर 2022 रोजी 'महात्मा गांधीं'वर लिहिलेली अभिवादनपर पोस्ट पाहा.
महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.
विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.
शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला.
हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
श्री. राजसाहेब ठाकरेंनी २ ऑक्टोबर २०२२ ला 'महात्मा गांधीं'वर लिहिलेली एक अप्रतिम अभिवादनपर पोस्ट.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 29, 2023
महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की,… pic.twitter.com/xk2G8nC7Q5