Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेचा प्रत्यक्ष वापर सुरु; उद्योगमंत्री उदय सामंत ठरले पहिले प्रवासी
Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरु झाल्याने विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार पडला आहे.
Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरु झाल्याने विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार पडला आहे. 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत विमानतळावर कार्यरत झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष वापर रविवारी रात्री प्रथमच झाला. मंत्री उदय सामंत यांच्या खासगी विमानाने सुरक्षित टेक ऑफ केल्याने कोल्हापूर विमानतळ 24x7 सेवेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
रविवारी रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी या विमानतळावरून पहिल्यांदाच खासगी विमानाचे टेक ऑफ झाले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय तिरुपतीला विमानाने रवाने झाले. तीन तारखेपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु झाली असली, तरी कोणत्याही एअरलाईन्सने अथवा खासगी विमान वापरकर्त्यांनी परवानगी मागितली नव्हती. मंत्री उदय सामंत यांनी तिरुपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे नाईट टेक ऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाला शनिवारी दिली होती. त्यानुसार रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाने तिरुपतीसाठी टेक ऑफ केले.
THE AUSPICIOUS CONNECTION BETWEEN KOLHAPUR AND TIRUPATI. We @aaikolhaairport team of @AAI_Official proved our preparedness for night OPS. Bombardier Learjet 45 VTCRA created history being first instrument DEP RWY25 that took off for Tirupati at 0946PM. pic.twitter.com/vJSVGbDFb7
— कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport (@aaikolhaairport) November 13, 2022
पहिल्यांदाच सेवा देण्यात येणार असल्याने सुरक्षित तपासणी करण्यात आली होती. सुरक्षितपणे सुरक्षित सेवा देण्यास विमानतळ सज्ज असल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, उदय सामंत म्हणाले की, कोल्हापूरमधील नाईट लँडिंग सुविधेमुळे येथील विमानाची विमानसेवेची गती वाढणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा प्रारंभ करण्याची संधी मला मिळाली माझे भाग्य आहे, उद्योजक व्यावसायिक आणि विविध कंपन्यांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी असलेले विमानाला कोल्हापूर विमानतळावर लँडिंग, टेक ऑफ करता येणार आहे. तीन एटीआर आणि एक एअरबस थांबवण्याची व्यवस्था झाली आहे. धावपट्टीवरील विमानांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, धुक्यामध्ये लँडिंग, टेक ऑफसाठी मदत करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डीजीसीएकडून परवानगी मिळाली आहे.
विमानतळावर कोणत्या सुविधा उपलब्ध?
- न्यू अॅप्रन
- आयसोलेशन-वे
- टॅक्सी वे
- नाईट लँडिंग सुविधेमुळे कोल्हापूर विमानतळावर विमाने पार्क होऊ शकतील
इतर महत्वाच्या बातम्या