Nana Patekar : ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, त्या दिवशी महाराष्ट्र एक नंबर होईल : नाना पाटेकर
Nana Patekar : ज्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या (Farmers suicide) थांबतील, तेव्हा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल असे मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.
Nana Patekar on Farmers suicide : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता येईल याचा प्रत्येकानं विचार करायला हवा, असे मत अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी व्यक्त केलं. सरकार त्यांच्या बाजूने जे करायचे ते करत राहील. मात्र, आपल्याला काय करता येईल हे पाहायला हवं. ज्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या (Farmers suicide) थांबतील, तेव्हा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल असेही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. नागपूरात शुक्रवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अन्य नेते उपस्थित होते.
ऋतुचक्र खूप बदललं आहे. शेतकऱ्यांनी नेमकं कशाच्या आधारावर जगायचं हे कळत नाही असेही पाटेकर म्हणाले. आपल्याकडे मार्केट तज्ज्ञ पाहिजे, कारण शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतल्यावर त्याला फायदा होईल हे कळायला हवे. ज्या दिवशी राज्यातील शेतकरी आत्महत्या करणं बंद करेल तेव्हा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल असेही नाना पाटेकर म्हणाले. आता पारंपारिक पद्धतीनं शेती करुन फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे असे पाटेकर म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थलांतर करुन शहारात जाऊ नये
शेतकऱ्यांच्या मुलांनी गावातून स्थलांतर करुन शहारात जाऊ नये. जिथे आहे तिथे आपली जमीन न विकता राबायला तिथं राबायला पाहिजे असे पाटेकर म्हणाले. स्थलांतर पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे. आता लोकसंख्या वाढली आहे. मात्र, जमीन तेवढीच आहे. बाकीच्या सगळ्या विषयांवर आपण बोलत असतो, पण लोकसंख्येच्या बाबतीत आपण का बोलत नाही? ही सगळ्यात मोठी समस्या असल्याचे पाटेकर म्हणाले. गावात काही गोष्टी टिकून आहेत मात्र, शहरात ऐकमेकांकडे पाहायला देखील वेळ नाही. फार दयनीय अवस्था असल्याचे पाटेकर म्हणाले.
मी शहरात राहणं बंद केलं
मी शहरात राहणं बंद केलं केलं आहे. मला शहरात श्वास घेता येत नाही शहरात. मी खेड्यात राहतो. मोठमोठ्या इमारती, गाड्या बघितल्या की मला भीती वाटते असे नाना पाटेकर म्हणाले. आपणचं एकमेकांना सांभाळणे गरजेचे आहे. राजकारणावर मला बोलायचे नसल्याचे ते म्हणाले. आपण पुन्हा पुन्हा चक्रुव्युहात अडकत आहोत. एकादा भ्रष्ट अधिकारी असेल तर आपण सगले का त्याच्याविरोधात नाही बोलत. तो एक असतो आपण सगळे असतो तरीही बोलत नाही. हे शक्य होईल पण त्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे असे नाना पाटेकर म्हणाले. राज्यकर्त्यांनी बांधलेल्या भिंती तोडा तुम्ही सगळे एकत्र या असे आवाहन पाटेकर यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या: