एक्स्प्लोर
तृप्ती देसाईंचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश
नाशिक : स्वराज्य संघटनेच्या महिलांनंतर आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिराच्या नियमानुसार तृप्ती देसाई यांनी साडी नेसून गर्भगृहात प्रवेश केला आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं.
यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराला छावणीचं रुप आलं होतं.
दर्शनानंतर तृप्ती देसाईंनी आनंद व्यक्त केला. तसंच सर्व मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मात्र आजही तृप्ती देसाईंना विरोधाचा सामना करावा लागला. त्र्यंबकेश्वरवासियांनी काळे झेंडे लावून तृप्ती देसाईंचा निषेध केला. पोलिसांचा वापर करुन धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत निषेध म्हणून एकही महिला आज मंदिरात जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वरच्या महिलांनी दिली.
तर तृप्ती देसाईंना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल स्थानिक तरुणीने संताप व्यक्त केला. हा देसाईंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. पोलिसांनी संबंधित तरुणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तृप्ती देसाईंना तिथून तात्काळ रवाना केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement