पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.


आतापर्यंत जगभरात 4 हजार जणांचे प्राण घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा भयाण चेहरा समोर आला आहे. पुण्यातील कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णाचे नाव आणि ओळख काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावर उघड केली होती. 'आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा' असं म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करता कामा नये,असे आम्ही पहिल्या दिवसांपासून आवाहन करीत आहोत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने पोलिस विभागाचे सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

Corona patients complaints | पुण्यातील नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांकडं दुर्लक्ष; रुग्णांची तक्रार | ABP Majha



दरम्यान कोरोना व्हायरसबाबत अत्यंत बेजवाबदार आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. याचा फटका अनेकांना बसताना दिसत आहे. कोरोनाबाबतच्या सोशल मीडियावरील अफवांचा फटका नांदेडमधील एका तरुणाला बसला आहे. या तरुणाला मानसोपचार घेण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियात सतत कोरोना आजाराची लक्षणे, उपचार, आजवर किती रुग्ण या आजाराने दगावली, याची माहिती तो सातत्याने सोशल मीडियावरुन घेत होता. मात्र सातत्याने कोरोनाविषयीची माहिती वाचून आणि गप्पा ऐकूण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि आपण आता मरणार असं तो सतत बडबडू लागला.

संबंधित बातम्या :

Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं

#Coronavirus Rumors | कोरोनाविषयीच्या सोशल मीडियावरील अफवांनी तरुणाच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचार सुरु

coronavirus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल