सांगली : मुलानेच आपल्या आई-वडिल आणि बहिणीचा निर्घुण खून केल्यची धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीमध्ये घडली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली असून आरोपी हत्या केल्यानंतर उमदी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याने आपणच या हत्या केल्याची कबुली पोलिसाना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून तत्काळ घटनास्थळी पोहोचले.


जत तालुक्यातील उमदी ते जतकडे जाणार्‍या रस्त्यावर आणि पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल्या अरकेरी वस्तीवर मुलानेच शेतजमिनीच्या वादातून आई नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी, वडील गुरलिंगाप्पा आण्णाप्पा अरकेरी आणि बहिण समुद्राबाई शिवलींगाप्पा बिराजदार यांचा दांडक्याने डोक्यात गंभीर वार करून निघृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिदाप्पा गुरूलिंगाप्पा अरकेरी असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने आरोपी हा उमदी पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.


पाहा व्हिडीओ : Sangli Crime | पलूसमध्ये उद्योजक प्रदीप वेताळ यांच्या कारवर अज्ञातांचा गोळीबार



गुरलिंगाप्पा अरकेरी यांची उमदी ते चडचण रस्त्यावर सहा एकर व जत रस्त्यावर बारा एकर अशी शेतजमीन होती. यापैकी चार एकर आरोपीच्या नावे आहे. आरोपी सिदाप्पा हा आई वडिलांचा सांभाळ करत नसल्याने तो गावातच राहण्यासाठी होता. बहिण समुद्राबाई बिराजदार हिचे सासर मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्षांपासून ती उमदी येथे आई वडील यांच्या सोबत राहत होती.


दरम्यान, याच बहिनीची मुलगी आरोपीची पहिली पत्नी आहे. तिचाही दुर्धर आजाराने एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला असून आरोपी सिदाप्पा याने लगेचच दुसरा विवाह केला आहे. तर आई वडिलांचा आजारपणात भावकीतील संतोष अरकेरी याने पाच ते सहा लाख रुपये घातले. याबदल्यात गुरलिंगाप्पा यांनी संतोष याच्या नावे चडचण रस्त्यावरील सहा एकर जमीन एक वर्षापूर्वी नावावर करून दिली आहे. याचा राग आरोपी सिदाप्पा याच्या मनात होता. यावर गावातील पंचांनी मध्यस्थी ही केली होती. तसेच जत रस्त्यावर बारा एकर जमीन आहे. त्यापैकी चार एकर जमीन आरोपी सिदाप्पा याच्या नावावर आहे. उर्वरित जमीन आई वडील मला देणार नाहीत, तिही दुसर्‍याला देतील, या भितीने आरोपी सिदाप्पा अरकेरी याने आई नागव्वा, वडील गुरलिंगाप्पा अरकेरी व बहिण समुद्राबाई बिराजदार यांनाच कायमचे संपवले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपी सिदाप्पा याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर करत आहेत.


संबधित बातम्या : 


शेकडो गुन्हे दाखल असलेल्या अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त


मुंबईत हेल्मेटधारी चोरांचा सुळसुळाट; एकट्यावृद्ध महिलांना करतात टार्गेट