1.जागतिक आरोग्य संघटनेकडून महामारी म्हणून घोषित, भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द, जगभरात कोरोनाने चार हजार बळी


2. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर, मुंबईतही दोघांना लागण, तर पुण्यात तब्बल 8 कोरोनाग्रस्त, नागपुरातही एक रूग्ण पॉझिटिव्ह

3. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपणार, आजपासून विधीमंडळात सामान्यांना प्रवेशबंदी, आयपीएल रद्द करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

4. राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे, आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, खडसेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम, तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा अर्ज, चौथ्या जागेवरुन कुरबुर कायम

5. दिल्ली दंगलीवर बोलताना अमित शाहांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणावर बोट, काँग्रेस नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा गृहमंत्र्यांचा आरोप
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 मार्च | गुरूवार | ABP Majha


6. आज तिथीनुसार शिवजंयती, औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम, राज्यभर शिवभक्तांचा उत्साह, कोरोनामुळे शिवसेनेकडून शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द

7. येस बँकेच्या राणा कपूर यांच्या ईडी कोठडीत वाढ, 16 मार्चपर्यंत कोठडीत मुक्काम

8. सांगलीत तिहेरी हत्याकांडाने खळबळ; आई,वडील आणि बहिणीची भावाकडून हत्या, पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली

9. ऐतिहासिक शिवाजी पार्क आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’,महापालिकेत नामविस्ताराचा प्रस्ताव मंजूर

10. भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेला सुरुवात, 3 सामन्यांच्या मालिकेतला आज पहिला सामना धरमशालामध्ये