एक्स्प्लोर
शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी
गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा न झाल्याने सोलापुरातील शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव विरोधात पोलिसांनी ही कारवाई केली.
![शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी Action under MPDA against Shiv Sena corporator, sent to Yerawada Jail शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/09174759/web-14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा न झाल्याने सोलापुरातील शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव विरोधात पोलिसांनी ही कारवाई केली. लक्ष्मण जाधवला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी खासगी सावकारीच्या प्रकरणात अटक केली होती. सराईत गुन्हेगार असलेल्या लक्ष्मण जाधव याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 11 गुन्हे देखील दाखल असल्याचे देखील पोलिसांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन जाधवची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
लक्ष्मण जाधव याने सोलापुरातील रामवाडी, न्यू धोंडिबा वस्ती, सेटलमेंट फ्री कॉलनी क्रं. 3 आणि 6, वांगी रोड, बाळे क्रॉस रोड, उमा नगरी, भैय्या चौक, लक्ष्मी विष्णू चाळ, मॅकनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक इत्यादी परिसरात गंभीर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील लोकांना धमकावने, मारहाण करणे, बेकायदेशी जमाव जमवून दंगा करणे, खंडणी वसूल करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राने मारहाण करणे, जुगार खेळणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, विनापरवाना सावकारी करणे, कर्ज वसूलीसाठी त्रास देणे यासारखे गुन्हे जाधव विरोधात दाखल आहेत.
गंभीर स्वरुपांच्या या गुन्ह्यामुळे लक्ष्मण जाधव याची सलगर वस्ती पोलिस ठाण्यात माहितगार गुन्हेगार म्हणून गुंडा रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आलेली होती. 1994 पासून आतापर्यंत सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील फौजदार चावडी, सलगर वस्ती पोलिस ठाण्यात एकूण 11 गंंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधव याला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी 2012 साली कलम 107 फौ. प्र. सं. अन्वये प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा न झाल्याने एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.
मागील दोन महिन्यांपूर्वी हॉटेल व्यावसायिक असलेल्या अमोल जगताप यांनी सावकारी त्रासाला कंटाळून आपली पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली होती. या प्रकरणी लक्ष्मण जाधव याचे नाव देखील आरोपी म्हणून पुढे आले होते. त्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण जाधव यास अटक केली होती. बेकायदेशीर सावकारी करुन अमोल जगताप आणि त्यांच्या कुटुंबास खंडणी मागून, खून करण्यास अप्रत्यक्षरित्या कारणीभूत तसेत जगताप यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गंभीर गुन्ह्यांमुळे एपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करुन जाधव याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी माहितीपत्रकाद्वारे दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)