एक्स्प्लोर

'ओला'च्या बिझनेस मॉडेलला मोठा धक्का, सोलापुरात ओला बाईक्सवर कारवाई

सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी भरारी पथकाला आदेश देऊन शहरात आणि परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटरसायकल चालक-मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

सोलापूर : मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या शहरात सुरू असलेल्या 'ओला बाईक्स'च्या बिजनेसला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे  मोटर सायकलवरून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मोटरसायकल चालक-मालकांवर सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या कारवाईनंतर मागील 3 महिन्यापासून सोलापूरात सुरू असलेली ओला बाईक सेवा बंद झाली आहे. अॅपद्वारे बुकिंग केल्यानंतर प्रवासी वाहतुकीची सेवा ओलातर्फे देण्यात येते. त्याच धर्तीवर 'ओला'ने सोलापुरात नुकतीच 'ओला बाईक'ची सुरूवात केली होती. 'ओला'ची दुचाकी सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांचाही प्रतिसाद मिळत होता. नागरिकांना जरी ही सेवा सोयीस्कर वाटत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच मोटार वाहन अधिनियमानुसार खासगी वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करणे चुकीचे असल्याने ओलावर कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरात ओला कंपनीच्या ॲपवरून खाजगी मोटरसायकलस्वार बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी भरारी पथकाला आदेश देऊन शहरात आणि परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटरसायकल चालक-मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या भरारी पथकाने सुरुवातीला सापळा रचत ओला अॅप वरून दुचाकी बुक केली आणि त्यानंतर त्यास परिवहन विभागाच्या ऑफिसपर्यंत नेण्यात आले. प्रवासानंतर रीतसर मेसेजही आला आणि प्रवासाचे पैसे दिल्यानंतर त्यास पथकाने कागदोपत्रांची मागणी केली. मात्र वाहन चालकाकडे प्रवासी वाहतुकीचे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आल्याने मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि  मोटरसायकल चालक विशाल यादव व मालक विश्वास यादव या दोघांविरुध्द कारवाई केली. मोटर वाहन निरीक्षक अशोक केवट, महेश रायबान, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नानासाहेब शिंदे यांच्या पथकाने सोलापुरात 300 ओला बाईक सुरू असल्यासाची माहिती दिली आहे. त्यातले अनेक बाईक चालक हे बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget