एक्स्प्लोर
गोसेखुर्द सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदाराची मुंबईत आत्महत्या
मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीमध्ये गोळी झाडून घेत त्याने आत्महत्या केली.

मुंबई/नागपूर : विदर्भातील गोसेखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक जीगर प्रवीण ठक्कर (41) याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीमध्ये गोळी झाडून घेत त्याने आत्महत्या केली.
गोसेखुर्दच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील शाखा कालव्याच्या शेवटच्या भागाचे मातीकाम आणि बांधकाम याचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला देण्यात आलं होतं. तब्बल 56 कोटी रुपये किंमतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये दोन्ही कंपन्यांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन हे कंत्राट मिळवल्याचं एसीबीने केलेल्या तपासात उघड झालं. अखेर एसीबीने तत्कालीन अधिकार्यांसह संचालक कालिंदी शाह, तेजस्विनी शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जीगर ठक्कर, अरुणकुमार गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
घोटाळ्याच्या तपासाअंती एसीबीने 12 आरोपींविरोधात जानेवारी महिन्यात तब्बल 4 हजार 457 पानांचं आरोपपत्रही दाखल केलं. घोटाळ्याची सुनावणी सुरू असतानाच घाटकोपरमध्ये कुटुंबासोबत राहत असलेला जीगर मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मरीन ड्राईव्ह येथे पोहोचला. त्याने चालक सुनील सिंग याला एनसीपीए समोरील एन. एस. रोडच्याकडेला कार पार्क करण्यास सांगितलं.
सिंग याने कार पार्क करताच फोनवर बोलायचं आहे असे सांगून जिगरने त्याला कारच्या बाहेर जाण्यास सांगितलं. सिंग हा कारपासून काही अंतरावर उभा असतानाच जीगरने त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
कारमधून मोठ्याने आवाज आल्याने सिंगने कारच्या दिशेने धाव घेतली. सिंगने कारचा दरवाजा उघडून बघितला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जिगर दिसला. त्याने तात्काळ याची माहिती कुटुंबीयांना आणि पोलिसांना देत जीगरला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरू आहे. जीगरने आत्महत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी जीगर आपल्या बांधकाम कंपनीच्या कार्यालयात गेला होता. तेथून तो बँकेत गेला. त्यानंतर जीगरने चालक सिंग याला कार मरीन ड्राईव्ह येथे नेण्यास सांगितल्याचं समोर आलं. आर्थिक अडचणीतून त्याने आत्महत्येचे हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
